कळी प्राजक्ताची
एक कळी प्राजक्ताची अशी का ग रूसलेली?
एका क्षणात लाजून अशी का ग हसली ती?
तिला वेडी म्हणू की वेड मला लागलेले
तिच्या मूक बोलण्यात गूढ अर्थ लपलेले
पाहू कसे तिला, बोलू कसे मी तिच्याशी
बोलायला जाता माझे शब्द अडती ओठाशी
तिचे असेही वागणे तिचे तसेही बोलणे
माझ्या मनी रुंजी घाली तिचे सूर हे दिवाणे
बाकी कशीही असली तरी रोज ती खुलते
तहानलेल्या धरेवर जशी सर पावसाची बरसते.
- अमेय सु. बाळ.