10 July, 2011

हुरहुर












नभ पांघरून आली अशी सांज पावसाची

सांग शमणार कधी हुरहुर या मनाची ॥धृ॥

वारा वाहतो इथे हा

उठे गंध मोगर्‍याचा

सळसळत्या पानात

भास तुझ्या हसण्याचा

मज वेडावून गेली साद रानपाखराची

सांग शमणार कधी हुरहुर या मनाची ॥१॥

होवूनिया धुवाधार

थेंब असे बरसले,

त्यात तुझ्याच

प्रितीचे सप्तरंग उमटले

मज ओढावून गेली ओढ तुझ्या आठवांची

सांग शमणार कधी हुरहुर या मनाची ॥२॥

No comments:

Post a Comment