07 April, 2011


क्रिकेटचा ‘पॉवर’प्ले...!








भारतीय संघानं विश्वचषक जिंकला आणि तब्बल एकशे वीस कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण झालं. उद्यापासून म्हणजे निव्वळ पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आयपीएल ला सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा २८ मे पर्यंत लांबणार आहे. त्यानंतर जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. हा दौरा जुलैपर्यंत चालेल. ऑगस्ट महिन्यात टी-२० विश्वचषक. असं धावपळीचं वेळापत्रक असताना खेळाडूंच्या तंदुरूस्तीचं काय? त्यांची शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य यावर काहीच परिणाम होणार नाही असंच वाटतंय का सगळ्यांना?

संघव्यवस्थापन या संदर्भात काय काळजी घेत आहे? या ‘अति’क्रिकेटमुळे त्यांच्या कामगिरीवर किती परिणाम होईल? तीसुद्धा माणसंच आहेत. पण आपल्याला त्याच्याशी काहीही देणघेण नाही. स्वत:चे खिसे भरण्यात मशगूल असलेली ‘पॉवर’बाज माणसं जोपर्यंत तिथे आहेत तोपर्यंत या गोष्टीवर काहीही तोडगा निघू शकत नाही.

क्रिकेटचं मैदान हे जणू एक मोठ्ठ शेत आहे आणि त्या शेतात अकरा ‘बैल’ नांगराला जोडून त्यापासून येणारं उत्पन्न ‘कृषिमंत्र्यांना’ चांगलाच लाभ देतंय बहुतेक…! पण आजवर अनेकवेळा जाणीव करून देऊनही खेळाडूंच्या ‘फिटनेस’बाबतचा मुद्दा नेहमीच उपेक्षित राहिला. मात्र त्यांच्या ताळूवरचं लोणी खाणारे दिवसेंदिवस अधिकच ‘फिट’ होत चालले आहे.

तुम्हाला याबाबत काय वाटतं? आपली मतं अवश्य नोंदवा.

5 comments:

  1. cricket ha khel na rahta vyavsaay jhalay ani tyamulech crivketpatu kheladu na rahta cricket mandala che "Employee" jhale ahet. hi stiti nakkich changli nahi.....kheladuna hi ani cricket la hi...

    ReplyDelete
  2. Mala vatat ya ati cricket mule te mentaly disturb
    honar ani mg yacha tyanchya kelavarsudha prinam honarch. shevti tyanchya mansiktecha sudha vichar
    krayla hvach. ani to cricket mandala kdun hoil as vatat nahi.

    ReplyDelete
  3. Indian cricket team ne world cup win kela tar tyana paise,car,lands......milale pan je aaplya deshache protecton kartat tya Indian Solders na kay milte.......26/11 la Indain solders aale hote terrorist cha khatma karayla he Indian cricketers nahi.......26/11 la shahid jhale tyana facta man-vandana milali pan tyancha familyche kay.......he Indian cricketers air conditionning madhe zhoptat...pan aaple Indian Solders day night(cold,heat,rain)aaplya protection sathi border var astat tyana kai milte......???????? Vichar kara.......

    ReplyDelete
  4. प्रदीप तुझे विचार खरच खूप सुंदर आहेत. पण आपल्या देशात अशा विचारांची कदर करणारी माणसं खूप कमी आहेत. त्यातून जे सीमेवर लढतात त्यांना मंजूर झालेले भूखंड पोटात घालून आपल्या नेत्यांनी नवनवीन “आदर्श” घातलेलेच आहेत. तरीदेखील आपण आपली मतं मांडायलाच पाहिजेत.

    ReplyDelete
  5. Khara ahe aaj cricket ha khel nasun paise kamavnyacha madhyam jhala aahe ani ipl hey tyacha udharan.Mala asa vata ipl madhe bhag gheun sachin sarkhe mhote khiladi patu aapla vel n talent donhi vaya ghalat ahe jyat te svatacha deshala pan represent nahi karat ahet . "Its just a way to earn more money in less time".

    ReplyDelete