जा . . .
राहिलेले गीत माझे तेवढे
गाऊन जा
तू दिलेले क्षण सुखाचे तेवढे घेऊन जा॥१॥
तू दिलेले क्षण सुखाचे तेवढे घेऊन जा॥१॥
या रित्या झोळीत माझ्या
शब्दगंध साचले
जे मी आहे वेचले तेवढे उधळून जा॥२॥
जे मी आहे वेचले तेवढे उधळून जा॥२॥
सुन्न त्या तिमिरातळाशी
व्यर्थ दीप का जळे
अंतरीची ज्योत माझ्या तेवढी विझवून जा॥३॥
अंतरीची ज्योत माझ्या तेवढी विझवून जा॥३॥
संपले आहेच सगळे तरी उभारी या
जीवा
जन्मलेले रोप तान्हे ते पुन्हा खुरडून जा॥४॥
- अमेय बाळ
No comments:
Post a Comment