26 July, 2013















तरीही . . .

चालले पुढल्या वाटा
तरीही . . .
मन मागेच रेंगाळते,
सोडून आले सगळे
तरीही. . .
चाहूल रेंगाळते.

तुला पाहूनी हसले होते,
तुझ्याबरोबर रमले होते,
एकटेच सोडले तुला
तरीही . . .
पाऊल रेंगाळते.

हात तुझे हाती होते,
गीत तुझे ओठी होते,
गाईलेच नाही
तरीही. . .
ती धून रेंगाळते.

चांदरात बहरली होती,
प्रीत खुळी मोहरली होती,
तुझीच झाले नाही
तरीही . . .
तृप्त गात्र गंधाळते.

संपविले मीच सगळे,
झालो आपण वेगळे,
विरले श्वास
तरीही . . .
नातेच सांभाळते.
-      अमेय सु. बाळ

2 comments: