निर्गुण . . . !
नको सत्तेचा व्यापार, नको धन व्यवहार
नको सगुण साकार, जिथे ब्रह्म निराकार॥
साधकाचे प्रतिमान, कैवल्याचे अनुमान,
जोगियाचे हेचि धाम, एक निरंजन नाम॥
व्यर्थ विषयांचे मनन, व्यर्थ वेदांचे पठण,
व्यर्थ परमार्थ जतन, ज्यास नाही ब्रह्म ज्ञान॥
कुणी अभंग रचिती, कुणी सुफियाना गाती,
कुणी सतनाम घेती हीच ब्रह्म्याची प्रचिती॥
मंदिराच्या गाभारर्यात, मशिदीच्या घुमटात
एक अनाहत नाद, अलख निरंजन गात॥
बाळ सांगे सावकाश, ऐका कान हो देवून,
मृत्यू पुढचे जीवन, तेचि निर्गुण निर्गुण॥
- अमेय सु. बाळ.
No comments:
Post a Comment