Fare ‘Well’
खरं तर कालपासून
अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता कृतज्ञता व्यक्त न करण्याबद्दलची आहे. काल Farewell झालं. प्राध्यापक
झाल्यापासून पहिलंच! ज्या बॅचला तीन वर्षं सलग शिकवलं, तीच ही बॅच!
आकाशाला गवसणी घालण्याल्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेली ही मुलं; आता त्यांच्या
पंखांत गगनभरारीचं बळही आलंय हे काल जाणवलं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे
तीन वर्षं मला; खडूस, सडू, भडकू, प्रोजेक्ट फाडू
म्हणणारे सगळेजण माझ्याबद्दल मनापासून चांगलं बोलत होते. मन भरून येत होतं, आपण जे करतोय ते
योग्य दिशेने करतोय याची पोहोच पावती मिळत होती त्यांच्या बोलणातून! खरं तर हे यश
माझं नाही ते माझ्या आई वडिल आणि गुरूजनांचं आहे. त्यांनी मला जो मार्ग दाखवला
त्या मार्गावर मी चाललो आणि माझं आयुष्य़ आकारात आलं आणि तोच वसा मी पुढे नेतोय.
आधी माझे वडिल, मग आई आणि नंतर नेने मॅडम नी
जसं मला घडवलं तसा मी घडत गेलो. पुढे शिंदे सर आणि रानडे सर यांनी घडवलं. मग बोरकर
गुरूजी भेटले आणि परिसस्पर्शच झाला जणू! बोरकर गुरूजी नेहमी म्हणतात "आपल्या
कार्यक्षेत्राच्या बाबतीत आपण कधीही समाधानी असू नये. कारण समाधानानी आपला
विकास खुंटतो." काल क्षणभर समाधान वाटलं की आपल्या गुरूंची शिकवण योग्य ठरली; पण लगेचच मनात
विचार आला की आता माझी जबाबदारी वाढल्ये. जी मुलं माझ्याकडे आदर्श म्हणून बघतात
उद्या पुढे येणार्या अनेक पिढ्य़ा मला घडवायच्येत. त्यामुळे इथेच थांबून चालणार
नाही आत अजून मेहनत घ्यावी लागणार. काल सगळे म्हणत होते "You are the best
teacher we ever had, who not only taught us lessons from syllabus; but also
lessons of how live life" मला माहित नाही मे
चांगल शिक्षक आहे क्की नाही पण एवढं नक्की जाणवलं की मी एक खूप चांगला विद्यार्थी
होऊ शकतो. ती ’क्षमता’ माझ्यात आहे. काल
माझ्याबद्दल जे काही चांगलं बोललं गेलं ते मी माझ्या गुरूजींना आणि आई वडिलांना
समर्पित करतो कारण आज मी जो काही आहे तो त्यांच्या मुळे आहे. म्हणूनच सुरूवातीला
म्हटलं की अस्वस्थता कृतज्ञता व्यक्त न करण्याची आहे. आता जरा बरं वाट्टंय.
No comments:
Post a Comment