29 May, 2011

शब्दांच्या हिंदोळ्यावरती आठवणींचे झोके उरले!












नमस्कार मित्रांनो,

आज खूप दिवसांनी ब्लॉगवर लिहावंसं वाटतंय आणि खूप दिवसांनी वेळही मिळालाय. पण याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज खूप दिवसांनंतर मनात जपून ठेवाव्या अशा आठवणी मला मिळाल्येत. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा असंख्य आठवणी असतात ज्या आपण आपल्या मनात जपून ठेवतो; खास करून बालपणातल्या आठवणी या खासच आपल्या लक्षात ठेवतो, तशीच एक सुखद आठवण आज मी मनात जपून ठेवल्ये.

आज खूप वर्षांनंतर मी माझ्या शाळेतल्या वर्गमित्र आणि मैत्रिणींना भेटलो. सुरूवातीला कोणाशी, कसं बोलायचं असा प्रश्नच पडला कारण आम्ही मित्र मित्र असतो तर ठीक होतं, पण मैत्रिणीही होत्या, त्यातून त्यांच्याशी शाळा सोडल्यापासून दूर दूर पर्यंत संपर्क नाही. त्यामुळे जरा गोचीच झाली पण नंतर मात्र मैफिल चांगलीच रंगू लागली. हळूहळू जुन्या आठवणी, एकत्र घालवलेले ते दिवस, त्यावेळी केलेली मस्ती, खाल्लेला शिक्षकांचा मार या सगळ्या आठवणी अगदी एखाद्या चित्रपटासारख्या झर्कन नजरेसमोर तरळल्या. आम्ही सगळेच एकमेकांच्यात पूर्णपणे मिसळून गेलो होतो अगदी पूर्वीसारखे! कोण कय करतं? कोणाचं कसं चाल्लय? याबाबतही चर्चा झाली. खूप टाईमपास, धमाल, मजा, मस्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणंही झालं.

या सगळ्या वेळात एक गोष्ट मात्र खूप त्रास देत होती ती अशी की त्यांच्यात असूनही मला खूप एकटं वाटत होतं. का माहित नाही पण काहीतरी मनात सलत होतं कारण ज्या आठवणी मी जपून ठेवल्येत त्यात काही कटू आठवणीही आहेत. नाही माझं मन दुखल्याच्या नाही पण मी कोणाचं तरी मन दुखवलंय याच्या! आणि तीच गोष्ट मला अजूनही डाचते, खर तर ज्या व्यक्तीचं मन मी दुखवलंय असं मला वाट्टंय ती व्यक्तीही आज होती पण त्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून मी मुद्दामच तो विषय काढलाअ नाही.

तरी असो ही एक गोष्ट सोडले तर मी खूप मजा केली, धमाल केली आणि नेहमीच जगतो तसे हे क्षण जगलो आणि मनाच्या सांदीकोपर्‍यात जपूनही ठेवले. पण खरंच शाळेतले दिवस हे तेव्हाच जगावे कारण ते पुन्हा परतून येत नाहीत आणि मी खूप भाग्यवान आहे की माझ्या सगळ्या मित्रांबरोबर मी ते दिवस जगलो. बस्स आता अश्रू नाही आवरत म्हणून एवढंच!

2 comments:

  1. khup chan bhavna mandlya aahes, tujya aani sarvanchyach. Kalcha divas kharch kadhi hi n visarta yenyasarkhach aahe.

    ReplyDelete
  2. hey mast vichar aani mast bhavna vyakt kelya aahes re.. पण ti konti व्यक्ती hoti???.."खर तर ज्या व्यक्तीचं मन मी दुखवलंय असं मला वाट्टंय ती व्यक्तीही आज होती" :)

    ReplyDelete