
ओढ...!
ही अशी ओढ का या जीवा लागते
जागूनी पापणी रात्र पाणावते ॥
पाऊली पैंजणे का उभी स्तब्ध ती
हातची कंकणे का नि:शब्द ती
आठवांचे तुझ्या मेघ का दाटले
जागूनी पापणी रात्र पाणावते ॥१॥
साळी सरी बरसल्या मन्मनी
आज गीतातूनी प्रीत ये दाटूनी
आपुल्या प्रीतीचे गीत गुंजारते
जागूनी पापणी रात्र पाणावते ॥२॥
न्हाहली प्रीत जी श्यामरंगातूनी
भेट ती आठवे रोमरोमातूनी
का तुझ्या लोचनी स्वप्न हे जागते
जागूनी पापणी रात्र पाणावते ॥३॥
khupch chan....
ReplyDeletehi kavita manala ekdum sparsha karun jatye....!