तू नसताना ...
तुळस डोलली नाही
प्राजक्त दर्वळला नाही
बकुळ फुलला नाही,
तू नसताना ……..
सूर रंगले नाही,
गीत स्फुरले नाही,
चांदणे लाजले नाही
तू नसताना……….
पैंजण निनादले नाही,
कंकणे गुंजली नाही,
श्वास नि:श्वासले नाही,
तू नसताना ………….
पाऊस रूसला नाही,
मेघ दाटले नाही,
अश्रु हसले नाही,
तू नसताना ……..
No comments:
Post a Comment