देऊळ . . .!
आजकाल मी
देवळात जाणं सोडलंय,
पायरीवरती जाऊनही दर्शन घेणं सुटलंय
पायरीवरती जाऊनही दर्शन घेणं सुटलंय
पूर्वी खूप
वेड होतं देवळामध्ये जायचं
“काय मित्रा कसा आहेस?” देवाला विचारायचं
लोकांनी मला
वेडा समजून दुर्लक्ष करायचं
त्यांना मूर्खात काढून मी माझं काम करायचं
त्यांना मूर्खात काढून मी माझं काम करायचं
येता जाता
देवळामध्ये रांगच रांग लागायची
देवाला आमीष दाखवून नवसाची लाच बोलायची
देवाला आमीष दाखवून नवसाची लाच बोलायची
कोणाचे पाच
नारळ तर कुणाचे २१ मोदक
कोणी लाखांमध्ये बोले, कुणी तोळ्यात मोजायचं
कोणी लाखांमध्ये बोले, कुणी तोळ्यात मोजायचं
हुजरेगिरीनी देवाकडून
काम काढून घ्यायची
काम झाल्यावर देवाकडे सपशेल पाठ फिरवायची
काम झाल्यावर देवाकडे सपशेल पाठ फिरवायची
देवळामध्ये मग
कुणीच नसतं गाभाराही खाली
हाच जगाचा नियम आहे गोंडस समजूत साली.
हाच जगाचा नियम आहे गोंडस समजूत साली.
तेव्हा मग
देवाला पुन्हा एकदा भेटायचं
अरे मित्रा मी आहे ना? देवाला सांगायचं.
अरे मित्रा मी आहे ना? देवाला सांगायचं.
असं म्हणून
देवाचा चेहरा क्षणभर खुलायचा
आनंदाने हसून मग सगळं तो विसरायचा
आनंदाने हसून मग सगळं तो विसरायचा
हळूहळू देवाची
महती गावोगावी झाली
आपली कामं करण्यासाठी लोकं देवळाजवळ आली.
आपली कामं करण्यासाठी लोकं देवळाजवळ आली.
गर्दीतून वाट
काढून देवापाशी जात होतो
मनामध्ये मात्र देवाची काळजी वाहत होतो
मनामध्ये मात्र देवाची काळजी वाहत होतो
गाभार्यात
आल्यावर नमस्कार केला
तेवढ्यात तिथल्या एजंटनी हात पुढे केला
तेवढ्यात तिथल्या एजंटनी हात पुढे केला
काय हवंय
तुला? मी त्याला विचारलं
१००१ दे म्हणून त्यानी मला फटकारलं
१००१ दे म्हणून त्यानी मला फटकारलं
कसले पैसे? मी
का द्यायचे? कसली ही मुजोरी
लूटमार करून का भरणार इथली तिजोरी?
लूटमार करून का भरणार इथली तिजोरी?
त्यावर मला
पत्रक दाखवून दात त्यानी विचकले
सरकारी नियम आहे सांगून खिसे माझे कापले.
सरकारी नियम आहे सांगून खिसे माझे कापले.
केविलवाण्या
नजरेनं देवाकडे पाहिलं
खांदे वर करून त्यांनी लक्ष दुसरीकडे वळवलं
खांदे वर करून त्यांनी लक्ष दुसरीकडे वळवलं
पाच
दीडक्यांच्या मोहाला माझा देव कसा भुलला
आता मात्र मनातून माझ्या तो पुरता उतरला
आता मात्र मनातून माझ्या तो पुरता उतरला
तेव्हापासून
माझं देवळात जाणं सुटलंय
पायरीवरती जाऊनही दर्शन घेणं सोडलंय
पायरीवरती जाऊनही दर्शन घेणं सोडलंय
ती मात्र रोज
यायची पायरीवरती थांबायची
तिथेच नमस्कार करून ती खाली निघून जायची
तिथेच नमस्कार करून ती खाली निघून जायची
कधी गरीबांना दान
दे, कधी अंधांला हात दे
कधी भुकेलेल्यांच्या मुखी अन्नाचा घास दे
कधी भुकेलेल्यांच्या मुखी अन्नाचा घास दे
तिचं वागणं
बोलणं अगदी साधं, सोपं होतं
तिला पाहून देवदर्शनाचंच समाधान मिळत होतं
तिला पाहून देवदर्शनाचंच समाधान मिळत होतं
पायरीवर एकटं
पाहून हळूच तिनी विचारलं
देवळात येऊन देवदर्शन नाही, हे नाही समजलं
देवळात येऊन देवदर्शन नाही, हे नाही समजलं
भूल पडल्यासारखी
तिला सगळी कहाणी सांगितली
खूप थकल्यासारखं वाट्टंय सावली थोडी मागितली
खूप थकल्यासारखं वाट्टंय सावली थोडी मागितली
हलकेच तिनी
डोक्यावरून हात माझ्या फिरवला
मन प्रसन्न होऊन तिनी सगळा थकवा जिरवला
मन प्रसन्न होऊन तिनी सगळा थकवा जिरवला
मग अचानक
लक्षात आलं देव देवळात नव्हता
झटकन समोर बघितलं तर सगळीकडे दिसला
झटकन समोर बघितलं तर सगळीकडे दिसला
आनंदाला
माझ्या पार नाही उरला
किती वेडा होतो याचाही विसर पडला
किती वेडा होतो याचाही विसर पडला
आनंदाच्या
भरात मी तिला मिठी मारली
भानावरती येऊन मी लगेच ती सोडवली
भानावरती येऊन मी लगेच ती सोडवली
ती ही थोडी
वरमली, लाजून तिथून नोघून गेली
जाता जाता उद्या येईन असे सांगून गेली
जाता जाता उद्या येईन असे सांगून गेली
आजकाल पुन्हा
देवळात येऊ लागलोय
देवाचं दर्शन ती घेते, तिचं दर्शन मी घेऊ लागलोय
देवाचं दर्शन ती घेते, तिचं दर्शन मी घेऊ लागलोय
कधी कधी
विचारते “ज्याचं दर्शन घ्यायचंय तो गाभार्यात बसतो”
हसून मग मी म्हणतो “तुझ्यापेक्षा देव आणखी काय वेगळा असतो”
हसून मग मी म्हणतो “तुझ्यापेक्षा देव आणखी काय वेगळा असतो”
-
अमेय सु. बाळ.
Wah mitra! Bhannat..
ReplyDeleteaawadli rao tumchi kavita..