श्रावणी . . .
संध्याकाळच्या ऊन्हात अचानक तुझी चाहूल
लागली.
सगळीकडे निशीगंधाचा दरवळ उठला,
पक्ष्यांच्या किलबीलाटानी सगळा
आसमंत भरून गेला,
तीच मनाला वेड लावणारी हूरहूर,
तेच भावनांचं उठणारं काहूर,
तोच मन व्याकूळ करणारा सूर
वार्याची झुळूक अलगद, हळूवार वाहू
लागली
संध्याकाळच्या ऊन्हात अचानक तुझी चाहूल
लागली ॥१॥
वार्याने स्पर्श करता अंगावर
रोमांच उठला,
मुक्या भावनांना अचानक कंठ फुटला
हीच ती मोहरण्याची वेळ,
हाच ऊनसावल्यांचा खेळ,
जिथे होतो दोन ऋतूंचा मेळ,
आभाळामध्ये आता ढगांची गर्दी होऊ
लागली
संध्याकाळच्या ऊन्हात अचानक तुझी चाहूल
लागली ॥२॥
सोनेरी ऊन जाऊन आता आभाळ दाटून आलं,
प्रत्येक थेंब टिपायला मन अधीर
झालं
वीज कडाडून बोलत होती,
वार्यासंगे डोलत होती
चिंब पावसाची हीच वेळ होती
थेंबाथेंबांची आता तळी होऊ लागली,
संध्याकाळच्या पावसात अचानक तुझी चाहूल
लागली ॥३॥
पाऊस आला म्हणजे तुझं येण पक्क
झालं,
नुसत्या नावाने तुझ्या सगळीकडे
लख्ख झालं
पैंजणांची नादात तीच जुनी गाणी,
डोळ्यामध्ये दाटलेलं तेच जुनं
पाणी,
मनामध्ये जपलेली हीच ती श्रावणी
पावसाच्या सरींमध्ये पुन्हा प्रीत
न्हाऊ लागली
संध्याकाळच्या ऊन्हातली चाहूल
पावसामध्ये शमली ॥४॥
No comments:
Post a Comment